बारामती (प्रतिनिधी) : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. बारामती बस स्थानक आज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी केली होती. इतर ठिकाणी सुरू असलेल्या संपाचा फटका बारामती बस स्थानकाला देखील बसला आहे.
बारामती बस स्थानकातील कर्मचारी आज संपात सहभागी नव्हते मात्र उद्यापासून कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्याबाबतचे पत्र प्राप्त झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बारामती बस स्थानकातून बस नियमानुसार सुरू होत्या. मात्र इतर ठिकाणी संप सुरू असल्याने एसटी बस सुटण्यासाठी विलंब होत होता. त्यामुळे बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र पुणे विनावाहक साठी एक ते दीड तास विलंब होत होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे विनावाहक च्या 25 फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या.