वारजे : पुणे महानगरपालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लॉगेथॉन २०२१ मेगा ड्राईव्ह आज सकाळी ७ ते ९ या वेळेत राबवण्यात आला. वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत वारजे हायवे चौक ते डुक्कर खिंड, गणपती माथा ते शिंद पूल, चर्च ते डुक्कर खिंड ,शिदे पूल ते इंगळे कॉर्नर, इंगळे कॉर्नर ते उत्तमनगर भाजी मंडई, पिकॉक लॉज ते गेट न. १० या ठिकाणी प्लॉगेथॉन २०२१ मेगा ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते. तसेच या करता वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालया तर्फे, सर्व नागरिकांसाठी या ड्राईव्ह मध्ये सहभागी होण्या करता आवाहन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात वारजे हायवे चौक येथुन स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. प्लॉगिंग (Plogging) या शब्दाची व्याख्या ‘अ कॉम्बिनेशन ऑफ जॉगिंग विथ पिकिंग अप लिटर अशी केली जाते. प्लॉगिंग हा शब्द ‘पिक अप लिटर’ म्हणजेच कचरा उचला आणि ‘जॉगिंग’ म्हणजे ‘व्यायामा साठीची दौड’ या दोन शब्दापासून बनला आहे.
‘एलिक अॅहलस्ट्रोम’ यांनी याची सुरुवात केली असून, याची संकल्पना भारतातील नवी पिढीने उचलून धरली आहे. कचरा मुक्ती म्हणजे भारतातील स्वच्छता आणि स्वच्छता म्हणजे आरोग्य ही साखळी लक्षात घेतली, तर प्लॉगिंगचे महत्व लक्षात येईल.
प्लॉगेथॉन म्हणजे जॉगिंग करता करता कचरा उचलणे. स्थानिक नागरिकांनी याला समर्थन देत आपला सहभाग नोंदवला. यावेळी दिपाली धुमाळ, बाबा धुमाळ, सचिन दोडके, सचिन दांगट, रविराज बेंद्रे- आरोग्य निरीक्षक, उपस्थित होते.