मुंबई – गोव्याकडे निघालेल्या क्रुझवर जी पार्टी आयोजित करण्यात आली होती, त्या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया डॉनही सहभागी होता आणि तो समीर वानखेडे यांच्याशी संबंधीत आहे असा एक नवीन आरोपही आज नवाब मलिक यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की हा ड्रग माफिया दाढीवाला माणूस असून तो त्याच्या मैत्रिणीसह यात सहभागी झाला होता. त्या िंठकाणी झालेल्या नृत्यातही तो सहभागी असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे. या दाढीवाल्या इसमाला या आधी राजस्थानात अटक झाली होती.
तसेच त्याला अन्यत्रही अटक करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. हा इसम कोण आणि त्याचे समीर वानखेडे याच्याशी नेमके काय संबंध आहेत याचाही तपास होण्याची गरज आहे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. क्रुझ पार्टीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जी दृष्ये चित्रीत झाली आहेत ती जाहीर करण्याची मागणीही मलिक यांनी केली आहे.