अबुधाबी – रसी वॅन दर दुसेन याच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा रोमहर्षक लढतीत 6 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना फकर झमानच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 186 धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे आव्हान ठेवले होते.
हा सामना दक्षिण आफ्रिका गमावणार अशी स्थिती असताना दुसेनने अफलातून शतकी खेळी केली व संघाचा विजय साकार केला. त्याला साथ देताना थेम्बा बवुमाने 46 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात दुसेन व डेव्हीड मिलर यांनी चौकार व षटकारांची आतषबाजी केली व पाकिस्तानचा पराभव केला.
अफगाणिस्तानचा विजय
अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजला 56 धावांनी नमवले. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने हजरत उल झझाई व महंमद शहजाद यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 5 गडी गमावून 189 धावा केल्या.
वेस्ट इंडिजचा डाव 5 बाद 133 धावांवर रोखला गेला व अफगाणिस्तानने 56 धावांनी विजय मिळवला. रॉस्टन चेस व निकोलस पूरन यांची लढत अपुरी ठरली.