वाघोली – हवेली तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदी संजीवनी कापरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पेरणे गणात पंचायत समिती सदस्य असणाऱ्या संजीवनी कापरे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य आहेत. यापूर्वी पेरणे गणातून उपसभापतीपदी माऊली वाळके यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्यानंतर पेरणे गणात संजीवनी कापरे यांना उपसभापती होण्याचा बहुमान मिळाला आहे.
हवेली तालुक्याच्या पूर्व भागातून नारायण आव्हाळे यांनीदेखील उपसभापती पदाचा कार्यकाळ अतिशय उत्तम पणे नागरिकांच्या हिताची कामे करून पूर्ण केला आहे. संजीवनी कापरे यांच्या निवडीबद्दल पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री. क्षेत्र तुळापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणेश पुजारी, माजी चेअरमन राजाराम शिवले, माजी ऊपसरपंच संतोष शिवले यांच्या हस्ते निवडीबद्दल संजीवनी कापरे यांचा सत्कार करण्यात आला.