नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी; अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या

नवी दिल्ली – फ्लिपकार्ट व अ‍ॅमेझॉन या दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांच्या सेलला कालपासून सुरुवात झाली आहे. प्रथमच या दोन्ही कंपन्यांनी एकाच दिवशी आपल्या सेलला सुरुवात केली आहे. फ्लिपकार्ट व अ‍ॅमेझॉन या दोघांचाही सेल 10 ऑक्टोबर पर्यंत चालू असणार आहे.

अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर देत आहेत. यामध्ये आपण मुळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत आपल्या साठी एक चांगला स्मार्टफोन खरेदी करू शकता. सवलत व्यतिरिक्त, दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एक्सचेंज ऑफरमधून सुद्धा तुम्ही सर्वोत्तम स्मार्टफोन खरेदी करू शकता.

अ‍ॅमेझॉनवर मिळत आहेत ‘या’ ऑफर
iPhone 11
अ‍ॅमेझॉनच्या सेलवर iPhone 11 चा 64जीबी व्हेरियंट असलेला फोन 38 हजार 999 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय, कंपनी अनेक आकर्षक ऑफर्ससह हा फोन खरेदी करण्याची संधी देखील देत आहे. या ऑफरसह, फोनवरील सूट 12 हजार 350 रुपयांपर्यंत जाते.

सॅमसंग गॅलेक्सी S20 FE

सॅमसंग गॅलेक्सी S20 FE हा फोन अ‍ॅमेझॉनवर 74 हजार 999 च्या ऐवजी 36 हजार 999 रुपयामध्ये खरेदी करू शकता. याशिवाय या फोनवर इतर ऑफर्ससह 12 हजार 350 रुपयांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

iQOO Z3 5G
या फोनची 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत कमी करून 17हजार 990 रुपयांवर आली आहे. याशिवाय या फोनला 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय मिळेल. 6 महिन्यांचा मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट कव्हरेज आणि अनेक आकर्षक एक्सचेंज ऑफरसह खरेदी करता येते.

रेडमी नोट 10 प्रो
ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्ही हा रेडमी फोन 19 हजार 999 रुपयांऐवजी 16 हजार 499 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय 12 हजार 350 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील या फोनवर मिळू शकतो.

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल मध्ये या आहेत बेस्ट ऑफर्स
Apple iPhone 12 आणि 12 Mini
सेलमधील टॉप डीलमध्ये तुम्ही अ‍ॅपलचे हे दोन्ही हँडसेट खरेदी करू शकता. सेलमध्ये किंमतीत कपात केल्यानंतर, आयफोन 12 च्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 49 हजार 999 रुपये आहे आणि 12 Mini 64 जीबी ची किंमत 38 हजार 999 झाली आहे. याशिवाय या फोनवर 15 हजार 800 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे.

गूगल पिक्सल 4a
फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 6 हजार रुपयांच्या सूटसह खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची किंमत 31 हजार 999 रुपयांवरून कमी करून ती 25 हजार 999 रुपये करण्यात आली आहे. सोबतच ICICI बॅंकेंच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ट वर 10 टक्के सुट देण्यात आली आहे.

मोटोरोला एज 20 फ्यूजन
अलीकडेच लाँच झालेला हा फोन सेलमध्ये 19 हजार 999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची मुळ किंमत 24 हजार 999 रुपये आहे. अ‍ॅक्सिस बँक किंवा आयसीआयसीआय बँकेच्या कार्टमधून पेमेंट केल्यास अतिरिक्त 10 टक्के सवलत या फोनवर देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.