पिंपरी – बोगस जामीनदार दिल्याप्रकरणी सात जणांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी बोगस जामीनदार प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विश्वनाथ बोजा शेट्टी (वय 56, रा. वनराज हॉटेल, भोसरी), विशाल विजय काळे (वय 21), सिद्धार्थ विजय काळे (वय 23, दोघेही रा. शंकरनगर, चिंचवड), सुनील मारूती गायकवाड (वय 52, रा. चावडी चौक, आळंदी), सुरेश विश्वनाथ चंद्रवंशी (रा. मरकळ रोड, आळंदी) आणि दोन महिला आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस कर्मचारी वैभव विठ्ठल एरंडे यांनी बुधवारी (दि. 22) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शेट्टी, विशाल काळे, सिद्धार्थ काळे, आणि महिला आरोपी यांना बोगस जामीनदार असल्याचे माहिती होते. तर उर्वरित आरोपी आपसांत संगनमत करून शासनाची फसवणूक केली.