Pune Crime : घरातील माैल्यवान ऐवज चाेरणारी घरकामगार महिला ‘जेरबंद’; तमिळनाडूतील घरातून 61 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे – तमिळनाडू येथून पुण्यात येऊन विविध भागातील घरात घरकामगार म्हणून काम करणाऱ्या एका घरकामगार महिलेने, घरातील व्यक्तींचा विश्वास संपादन करत त्यांना अन्नातून गुंगुीचे औषध देऊन माैल्यवान ऐवज चाेरुन नेण्याचे सत्र सुरु केले हाेते. परंतु वानवडी पाेलीसांचे पथकाने महिलाचा मागाेवा काढत थेट तमिळनाडूत जाऊन महिलेस ताब्यात घेऊन तिच्या घरातून ६० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक दिपक लगड यांनी दिली आहे.

शांथी चंद्रन (वय-४३,रा.तिरुलअन्नमलई, तमिळनाडू) असे अटक करण्यात आलेल्या घरकामगार महिलेचे नाव आहे. याबाबत वानवडी पाेलीस ठाण्यात मधुबाला प्रवीण सेठिया (वय-६०) यांनी फिर्याद दिली आहे. सेठिया यांचे घरात आठ एप्रिल राेजी घरकाम करणाऱ्या घरकामगार महिला शांथी हिने दहा लाख ५२ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने चाेरुन नेले हाेते.

याबाबत पाेलीसांनी तपास सुरु केला असता, शांथी ही पुण्यातील येरवडा, लष्कर, काेंढवा, वानवडी, बंडगार्डन भागातील उच्चभ्रु साेसायटीतील वेगवेगळया घरात घरकामगार म्हणून शिरकाव करत असल्याची बाब समाेर आली. नवीन ठिकाणी काम करताना तीन ते चार दिवस काम करुन ती घरातील लाेकांचा विश्वास संपादन करत त्यानंतर घरातील व्यक्तींना जेवणातून अथवा खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन ती घरातील दागिने चाेरुन नेत.

तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शांथी ही तमिळनाडूत असल्याचे समजल्यानंतर वानवडी पाेलीसांचे पथक तमिळनाडूत गेले व त्यांनी तिचा शाेध घेत तिला जेरबंद केले. तिच्या घराचे घरझडतीत तब्बल ६० लाख ९४ हजार रुपयांचा चाेरीचा माैल्यवान मुद्देमाल मिळून आला असून चाेरीच्या ११ घटना उघडकीस आला. तिला न्यायालयात हजर केले असता, २४ सप्टेंबर पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.