पूर्व हवेलीत ‘राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आपल्या दारी’; प्रदीप कंद यांचा उपक्रम

वाघोली – शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या संकल्पनेतून जलदगती जनता समस्यानिवारण उपक्रम अंतर्गत  पेरणे  वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातील 21 गावांमधील प्रशासनाकडे प्रलंबित प्रश्न, गावातील सामाजिक प्रश्न व नागरिकांच्या वैयक्तिक समस्या याबाबतचे निवेदन स्वीकारून त्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्ता आपल्या दारी हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे वरिष्ठ सरचिटणीस प्रदीप वसंतराव कंद यांनी सुरू केला असून या   वाडेगाव येथून या उपक्रमास सुरुवात  करण्यात आली.

यावेळी प्रदीप वसंतराव कंद (वरिष्ठ सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य, सदस्य महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पुणे जिल्हा) योगेश शितोळे ( राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष ),राजेश भाऊ वारघडे ( राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पुणे जिल्हा ),संतोष गावडे ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी हवेली तालुका ),मानसिंग गावडे (माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी हवेली तालुका ),किरण शिंदे ( उपसरपंच शिरसवडी ),संजय शिंगारे ( माजी उपसरपंच फुलगाव ),विजय वाळुंज ( उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस ),श्यामराव खलसे ( सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ),प्रविन खलसे ( सरचिटणीस शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस )
दादा सुरेश भोरडे ( विद्यार्थी उपाध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ) आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.