धानोरे – देशभरात सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण आहार महिना म्हणून साजरा करण्यात येतो. एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प खेड-2 व बीट चऱ्होली केंद्र धानोरे खंडोबा माळ अंगणवाडी येथे पोषण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया यांना पोषण आहाराबाबत जनजागृती करण्यात आली. डोहाळे पुरवा व आहार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हातात फलक घेऊन महिलांनी प्रभातफेरी काढली.
यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका अनिता लांडे, सरपंच अनिल गावडे, उपसरपंच शांता गावडे, ग्रामपंचायत सदस्य संगिता लोंढे, सारिका गावडे, धीरज साबळे, उपस्थित होते. गरोदर स्त्रिया, बचतगटातील महिलाही उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका यशोदा गावडे, सुरेखा साबळे, दिपा ठाकूनर, ललिता तापकीर, आशाताई मोजाड, मंदाताई कुंभारकल्पना धोखे, प्रियंका ठाकूर व अंगणवाडी मदतनीस साधना गावडे, रेखा रोकडे, सीमा पवार, भाग्यश्री हेनगुरे यांनी परिश्रम घेतले.