मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये हे सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी रुजू झाले आहेत.
धम्मज्योती गजभिये, हे 27 ऑगस्ट 2021 रोजी वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे श्री. दि.रा. डिंगळे, सहसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी प्रभारी महासंचालक बार्टी, पुणे या पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
धम्मज्योती गजभिये, यांनी काल बार्टी मुख्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्प अर्पण करून अभिवादन करुन बार्टीच्या महासंचालक पदाचा नियमित कार्यभार स्वीकारला.