पुणे – गुलटेकडी परिसरात दहशत निर्माण करणारा गुन्हेगार गोविंदसिंग पापुलसिंग टाक टोळीविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. टोळीने खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, घातक शस्त्रे बाळगणे असे गुन्हे केले आहेत.
गोविंदसिंग पापुलसिंग टाक (22, गुलटेकडी), राहूल उर्फ लल्ल्या संजय कांबळे (20, रा. मंगळवार पेठ), गणेश साहेबराव तुपे (31), ओंकार राजेंद्र भुजबळ (22, रा. गणेश पेठ), सुनील विजय चव्हाण (27), सौरभ उर्फ साहिल शिवशरण कांबळे (19) अशी मोक्का लावलेल्यांची नावे आहेत.
टाक याला 2019 मध्ये एक वर्षासाठी स्थानबद्ध केले होते. कारवाईतून सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा साथीदारांच्या मदतीने खुनाचा प्रयत्न, दुखापतीचे दोन गुन्हे आणि हप्ते वसूली केली. टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी उपायुक्त सागर पाटील यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला होता.
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण गुन्ह्याचा तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक अशोक येवले, सहायक फौजदार प्रमोद कळमकर, अंमलदार विजय कुंभार, वैभव मोरे, विजय खोमणे, ज्ञानेश्वर बढे, मनोज भोकरे, लखन ढावरे, संदीप साळवे, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, शैलेश वाबळे, दीपक खंदाड, सचिन दळवी, ऋषीकेश टिटमे, गोडसे आदींनी केली.