पुणे – अल्पवयीन मुलीला मदत करण्याचा बहाणा करत तिचे अपहरण करून सामुहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी दोन आरोपीला अटक केली आहे. त्यांनी देखील मुलीवर बलात्कार केल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात संबंधित मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींची संख्या आता 16 वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या सर्व प्रकारणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे. चित्रीकरण नेमके कोणी केले व आता हे कोठे आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण 19 जणांना अटक केली आहे. त्यातील दोघेजण हॉटेल व्यवसायिक आहे. एक संबंधित मुलीचा मित्र तर उर्वरित 16 जण हे बलात्कार करणारे संशयित आरोपी आहेत. आरोपींंना या गुन्हयात अजून कुणी मदत केली आहे का? अल्पवयीन
मुलींना समज नसल्याचा फायदा घेऊन आणखी कोणत्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार
केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी 14 आरोपींना एस.पी पोंक्षे कोर्टाने आणखी चार दिवसांची तर अजून दोन आरोपींना 26 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मशाक अब्दुलमजीद कान्याल (वय 27 रिक्षाचालक, वैदूवाडी, हडपसर), अकबर उमर शेख (वय 32), रफिक मुतर्जा शेख (वय 32), अझरूददीन इस्लमामुददीन अन्सारी (वय 27), प्रशांत सँमिअल गायकवाड (वय 32), राजकुमार रामनगीना प्रसाद (वय 29 वर्षे), नोईब नईम खान (वय 24), असिफ फिरोज पठाण (वय 36), मिराअली उर्फ मिरा अजीज शेख (वय 26), शाहजुर उर्फ सिराज साहेबलाल छप्परबंद (वय 28), समीर मेहबूब शेख (वय 19), फिरोज उर्फ शाहरू ख साहेबलाल शेख (वय 22), महबूब उर्फ गौस सत्तार शेख (वय 23) आणि मोहम्मद उर्फ गोलू
मोज्जाम आलम (वय 19) अशी पोलीस कोठडी दिलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत गुरूवारी संपली. त्यांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर मेहबूब बादशाह शेख (वय 27) आणि इस्माईल लतीफ शेख ( वय 36) या दोघांना बुधवारी (15) अटक करण्यात आली त्यांना न्यायालयात आणले असता त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.