सासवड -विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या पुरंदर तालुक्यातील 115 युवक-युवतींना आमदार संजय जगताप यांच्या पुढाकाराने कोविशिल्डचा पहिला डोस रविवारी (दि. 15) सासवड येथील लसीकरण केंद्रात देण्यात आला.
यावेळी आमदार संजय जगताप यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. भविष्यात विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करून अडचणी सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले.
यावेळी तालुका युवक अध्यक्ष माऊली यादव, सासवड शहर विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष विवेक जगताप, जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सागर मोकाशी, तालुका उपाध्यक्ष दीपक कळसकर, आप्पा भांडवलकर, ओमकार निगडे, आदित्य जगताप यांसह कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.