मुंबई :काही दिवसांपूर्वी सोशल नेटवर्किंगवर ‘बचपन का प्यार.’ या गाण्याने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या गाण्याने अनेकांना भुरळ घातली आहे. त्यातच आता या गाण्याचे रानू मंडल यांना देखील वेड लागले असल्याचे दिसत आहे.
एका रात्रीतून स्टारडम मिळालेल्या यादीत राणू मंडल यांचा देखील नंबर लागतो. त्यातच छत्तीसगडमधील सुकमा येथील सहदेव नावाचा मुलगा या व्हायरल गाण्यामुळे रातोरात स्टार झाला आहे. इंटरनेटवर सहदेवच्या ‘बचपन का प्यार’ या गाण्याने धुमाकूळ घातला. या गाण्यासाठी अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते बॉलिवूडमधील गायकांपर्यंत अनेकांनी सहदेवचे कौतुक केले आहे. तसेच अनेक कलाकारांनी यावर रिल्स तयार करुन शेअर केले आहेत. रानू मंडल यांनी देखील हे व्हायरल झालेले गाणे गायले आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडिया आणि इंडस्ट्रीपासून दूर असणाऱ्या रानू मंडल यांनी ‘बचपन का प्यार’ हे गाणे गायले आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रानू मंडल यांच्या समोर हातात माईक धरुन उभा आहे. व्हिडीओमधील व्यक्ती देखील रानू यांना प्रोत्साहन देताना दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर रानू यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. रानू यांच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने ‘तुम्ही जिवंत आहात का?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तुम्ही चांगलं गात आहात’ असे म्हटले आहे.