नागपूर – स्वातंत्रदिनाच्या दिवशी धरणावर सेल्फी काढत असताना पाय घसरल्याने दोन सख्या भावडांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द मध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
#नागपूर हळहळले; स्वातंत्रदिनी सेल्फी घेताना दोन सख्ख्ये भाऊ बुडाले pic.twitter.com/MVAoccDCne
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) August 16, 2021
मंगेश जुनघरे आणि विनोद जुनघरे असे मृत भावडांची नावे आहेत. ते नागपुरातील उमरेड येथील रहिवासी आहेत. मंगेश व विनोद स्वातंत्र्य दिनानिमित्य पर्यटनाला गेले होते. तेथे सेल्फी काढत असताणा मंगेशचा मातीच्या ढिगाऱ्यावरुन पाय घसरून पाण्यात पडला. मंगेश वाचविण्यासाठी विनोदनेही पाण्यात उडी घेतली मात्र विनोदला यामध्ये यश मिळाले नाही. व हे दोन्ही भाऊ पाण्यात बुडाले.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.