नवी दिल्ली – काँग्रेसच्या माजी खासदार आणि विद्यमान अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा सुश्मिता देव यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला आहे. सुश्मिता देव यांनी आपला राजीनामा कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला आहे.
Former Congress MP Sushmita Dev resigns from the party
(file photo) pic.twitter.com/tlEyG5aKxX
— ANI (@ANI) August 16, 2021
सुष्मिता देव यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबद्दल काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली होती. तेव्हापासून त्या काँग्रेसला रामराम करणार, अशी चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. सुष्मिता देव यांचा राजीनामा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, सुष्मिता देव यांनी राजीनामा का दिला हे अद्याप स्पष्ट केलेले नाही आहे. त्याबरोबर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार यासंदर्भात सुद्धा त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.