नवी दिल्ली – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभर भारतीय नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. त्यामध्ये अनेक ठिकाणी कल्पकता दिसून येत आहे.
“एक भारत श्रेष्ठ भारत’ या मोहिमे अंतर्गत केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने तयार केलेला व्हिडीओ वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय राज्य घटनेच्या आठव्या शेड्युलनुसार संमत 22 अधिकृत राज्यभाषांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा संदेश दिल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातीला अनेकांनी या भाषांमध्ये नेपाळी भाषेचा समावेश असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र, नेपाळी भाषा ही भारतीय भाषांच्या सूचीमध्ये सामील असल्याचे त्यांना नेटकऱ्यांनीच लक्षात आणून दिले.
पहा व्हिडीओ आणि शेअर करा ही लिंक…
या व्हिडीओअमध्ये सर्वसामान्य नागरिक तर काही प्रशासकीय अधिकारी दिसत असून एका ओळीचा हा सर्व भाषांमधला संदेश लोक एकमेकांना शेअर करत आहेत.
त्यामध्ये पंजाबी, मल्याळी, हिंदी, ऊर्दू, तेलुगु, ओडिया, मराठी, गुजराती, नेपाळी, बंगाली, संस्कृत, तामिळ, मैथिली, संथाली, मणिपुरी, कन्नड, कोंकणी, काश्मिरी, सिंधी, डोग्री, बोडो आणि आसामी अशा भाषांचा समावेश आहे.