नवी दिल्ली – टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर सध्या बक्षिसांची बरसात होत असल्याची दिसत आहे. पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना अनेकांनी स्पेशल गिफ्ट दिले आहे तर काही कंपनांनी त्यांना महागड्या वस्तू भेट दिल्या आहे. त्याचप्रमाणे त्यांना राज्य सरकानेही बक्षिस जाहीर केल्याची घोषणा केली आहे.
यातच एकीकडे टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर सध्या बक्षिसांची बरसात होत असतांना दुसरीकडे मात्र, केरळ सरकारने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश कोणतेही बक्षिस जाहीर केले नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशलवर केरळ सरकार विरोधात नेटकऱ्यांकडून टीका केली जात होती.
सोशलवरही नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केल्यानंतर आता मात्र केरळ सरकारने श्रीजेशला दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तसेच श्रीजेशला बढती देण्याचा निर्णयही सरकारने घेतलाय. श्रीजेश सध्या सार्वजनिक शिक्षण विभागामध्ये उपनिर्देशक म्हणून कार्यरत होता. आता त्याला बढती देऊन सहाय्यक निर्देशक करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी, केरळ सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या हातमाग विभागाने श्रीजेशचा सत्कार करण्यासाठी फक्त धोतर, शर्ट आणि एक हजार रुपये असं बक्षिस देण्याचा निर्णय घेतला या निर्णयानंतर केरळ सरकार चांगलीच टीका झाली होती.
भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला, पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये संपवत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. पुरुषांच्या या संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेशचे योगदान सर्वांत मोठे आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतांना मात्र राज्याने त्याला बक्षिस जाहीर न केल्यामुळे श्रीजेशलाच्या चाहत्या वर्गाकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.