लंडन – जगातील सर्वात खतरनाक आणि विषारी समजल्या गेलेल्या एका कोळ्याच्या (spider) जातीच्या विषाचा वापर हृदयविकारावर (heart disease) उपचार करण्यासाठी केला जाणार आहे. याबाबतच्या संशोधनाला यश आले आहे.
फनेल बेब जातीच्या या कोळ्याच्या विषयांमध्ये अशा प्रकारचे विशिष्ट मोलेक्युल्स आढळले आहेत. ज्यामुळे हृदयविकारानंतर आरोग्य सांभाळण्याचे काम हे मोलेकुल करू शकतात आहे. ज्यांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली आहे. त्यांनाही या विषपासून तयार होणाऱ्या औषधाचा लाभ होणार आहे.
क्वीनसलँड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर नॅथन पल्पांत ग्लेन किंग आणि व्हिक्टर चेंग संस्थेचे पीटर मॅक्डोनाल्ड यांनी मिळून या विषापासून तयार होणारा या औषधाचा शोध लावला आहे. नाथन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या कोळ्याच्या विषयांमध्ये एच आय वन या नावाचे प्रोटीन आढळते या प्रोटीनच्या वापरामुळे हृदयविकारावर नियंत्रण राहू शकते हृदयाच्या पेशी मजबूत करण्याचे काम सुद्धा हे प्रोटीन करतात.
आजारनंतर हृदय मजबूत आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी अशा प्रकारचे आत्तापर्यंत कोणत्याही औषधाचा शोध लागण्यात आलेला नाही. पण आता या विषापासून तयार होणारे औषध हृदयविकाराच्या नंतरही हृदय मजबूत आणि व्यवस्थित ठेवण्याचे काम करणार आहे. डॉक्टर ग्लेन किंग या कोळ्याच्या विषावर संशोधन करत असताना. त्यांना हे प्रोटीन आढळले ब्रेन स्ट्रोक असलेल्या एका रुग्णावर या प्रोटीनचा वापर केला.
असता या रुग्णाच्या मेंदूवरही सुधारणा झाल्याचे लक्षात आले नंतर हृदयविकारासाठी या प्रोटीन चा वापर करता येईल का याबाबत संशोधन सुरू झाले. त्यानंतर हा निष्कर्ष समोर आला या विषाचा वापर तयार करून करण्यात आलेला औषध आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये हृदयविकारावर उपचार करण्यासाठी वापरता येऊ शकते हृदय विकाराचा झटका आल्यानंतर रुग्णावर जलद उपचार करणे गरजेचे असते.
त्यावेळी या प्रोटीन पासून तयार केलेले औषध उपयुक्त ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. ग्रामीण भागामध्ये हृदय विकाराच्या रुग्णांना जलद गतीने रूग्णालयात जाणे शक्य नसेल तर अशा काळामध्ये आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये हे औषध उपयुक्त ठरू शकते कसे बातमी.