जिनिव्हा – अन्य रोगांवर वापरण्यात येणारी 3 औषधे कराना विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपयोगी पडत आहेत का, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून सध्या चाचणी घेतली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनान घेब्रेयसिस यांनी बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आल आहे.
सध्या सुरू असलेल्या संशोधनाचा भाग म्हणून तीन औषधांच्या चाचण्या घेतल्या जातील. या औषधांच्या वापरामुळे करोनाच्या संसर्गानंतर रुग्णांचा मृत्यू टाळता येऊ शकेल. एका स्वतंत्र पॅनेलने या तीन औषधांची निवड केली आहे, असे “डब्लूएचओ’च्या निवेदनात म्हटले आहे.
मलेरियावर वापरण्यात येणारे आर्टेस्युनेट, कर्करोगावर वापरण्यात येणारे इमॅटिनीब आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सध्या वापरण्यात येणारे इन्फ्लिक्सिमॅब या औषधांच्या आगामी काही काळात करोना रुग्णांवर चाचण्या घेतल्या जाणार आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.