हडपसर : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाची संपूर्ण ताकद पणाला लावून महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकावण्याचा निर्धार आपण सर्वांनी करायचा आहे. त्यासाठी हडपसर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक विजयी होतील असे नियोजन आणि त्यादृष्टीने प्रयत्न आत्तापासूनच सुरू करावेत, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले.
मिशन २०२२ पुणे मनपा काँग्रेस अभियानच्या निमित्ताने सातवनगर येथे वैभव डांगमाळी याच्यां निवास्थानी हङपसर विधानसभा काँग्रेस कमिटी प्रभाग क्रमांक २६ मधील मुख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली.
त्यावेळी मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी हङपसर विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांतमामा तुपे होते.तर यावेळी पुणे शहर सरचिटणिस विजय जाधव, अजित ससाणे, दिलीप तुपे,सुनिल गायकवाड,गणेश फुलारे,नितीन आरू,अस्लम शेख, संतोष सुपेकर,योगेश गोधंळे,दिलीप जगताप,सुनिल गिरेल्ला,राजेंद्र डांगमाळी,देविदास गायकवाड, सुनिल पाटील, सुभाष सातव,स्वप्निल सातव ,राजेन्द्र मारने,सोहेल लांडगे,स्वप्निल डांगमाळी याच्यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या जरी राज्यात महाविकास आघाडी सरकार काम करत असले तरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष , पक्षाने केलेली लोकहिताची कामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, याशिवाय महापालिकेत काँग्रेसची सत्ता येण्यासाठी हडपसर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक विजयी होतील यासाठीही सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन शिवरकर यांनी यावेळी केले.
काँग्रेस पक्ष नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्याप्रमाणेच पदाधिकारी म्हणून आम्हीही सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत आहोत. हडपसर विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे.तेव्हा आगामी महापालिका निवडणुकीत येथून सर्वाधिक नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून यावेत, यासाठी प्रयत्न करावेत,असे मतदार संघाचे अध्यक्ष मामा तुपे यांनी सांगितले.
वैभव डांगमाळी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.हडपसर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमित घुले यांनी आभार मानले .