न्यूयॉर्क : जगभरात पुन्हा एकदा करोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण सापडत असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही चीनमध्येच मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर येत आहे. चीनमधील करोनामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी चिनी अधिकार्यांची भेट घेतली आणि चीनमधील करोनाच्या परिस्थितीबद्दल वास्तविक माहिती मागितली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख प्रमुख टेड्रोस यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना करोना बाधितांवर उपचार आणि लसीकरणासाठी चीनला योग्य ही मदत करेल. चीनमधील ढासळलेली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी WHO कडून मदत दिली जाईल. करोनाचा जास्त धोका असलेल्यांना लसीकरण करण्याचे आवाहनही टेड्रोस यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी चिनी अधिकार्यांची भेट घेतली आणि चीनमधील करोना महामारी आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल विशिष्ट आणि वास्तविक अहवाल मागवला आहे. WHO च्या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने उच्च-स्तरीय बैठकीत जेनेटिक सीक्वेंसिंग डेटा, रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण, अतिदक्षता विभागातील रुग्ण आणि करोनामुळे झालेले मृत्यू यासंबंधित चीनकडून सर्व डेटा मागितला आहे.
नागरिकांना विशेषत: 60 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या लसीकरणाबद्दलही अहवाल मागवला आहे. डब्ल्यूएचओकडून कोरोनाचा धोका पाहता वारंवार लसीकरणाचं महत्त्व सांगितले जात आहे. नागरिकांना लसीकरणासाठी आणि बूस्टर डोस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोग आणि रोग नियंत्रण आणि प्रतिबंध प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेला चीनमधील कोरोनाविरोधा लढण्यासाठीची सध्याची तयारी आणि उपाययोजना यांची माहिती दिली. करोना संसर्ग, करोना व्हेरियंट निगराणी ठेवणे, लसीकरण, आरोग्य विषयक उपाययोजना, संशोधन आणि विकास यासंदर्भातील माहिती दिली.