पुणे – 13 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले. ही कामगिरी केली आहे रोड मराठा नीरज चोप्रा याने.
प्रामुख्याने पाणीपत लढाईवेळी देश रक्षणासाठी गेलेल्या मराठा समाजाच्या वंशजांना आज रोड मराठा म्हणून ओळखले जाते.
अश्या हरियाणा स्थित रोड मराठा समाजात जन्मलेल्या चॅम्पियन नीरज चोप्रा यांचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले,
ऑलिम्पिक मधील इतर पदक विजेते खेळाडू व नीरज चोप्रा यांचा मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रात सत्कार करण्यात यावा असा निर्णय युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत करण्यात आला.