हाताला हात बांधून अल्पवयीन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

गडचिरोली – अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर या दोघांचे मृतदेह आढळले आहेत. मूळचे चंद्रपूरचे असलेल्या या दोघांनी गडचिरोलीत जाऊन हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या दोघांनी वैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केली आहे.

शिवाणी आणि शिवतेज (नावे बदललेली) यांचे एकमेकांवर प्रेम होते. मुलीचे वय 15 तर, मुलाचे वय 17 होते. या दोघांनी आत्महत्या का केली हे अद्याप समोर आले नाही. हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातल्या चिंचोली बुजुर्ग इथले रहिवासी होते.

शिवाणी आणि शिवतेजने एकमेकांच्या हाताला दोर बांधून गडचिरोली येथील आरमोरीच्या पुलावरून वैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हे दोघेही 3 ऑगस्टपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांकडून शोधाशोध सुरु होती. मात्र त्यांचा पत्ता लागला नसल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. ब्रम्हपुरी पोलिसांनी गडचिरोली पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. त्यांनी त्याबाबतचा तपास केला. त्यादरम्यान आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर दोन मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.