वाघोली – महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणी भाजप युवा मोर्चा सदस्य गणेश कुटे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सांगली-कोल्हापूर भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त भागातील नागरिक व कुटुंबियांना भाजप युवा मोर्चाच्या वतीने साधनसामुग्रीची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याची माहिती भाजप नेते गणेश कुटे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनानुसार तातडीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांनी केले होते त्यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे मित्र परिवाराच्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना साधनसामुग्रीची मदत करण्यात आली माहिती गणेश कुटे यांनी दिली आहे.
यावेळी युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील, उपाध्यक्ष अनुप मोरे, सरचिटणीस सुशील मेंगडे, उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर आदी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. तर या उपक्रमासाठी अविनाश कुटे, अजित कुटे, विशाल कुटे, युवा वॉरियर हवेली भाजप अध्यक्ष अक्षय कुटे, मनोज कुटे, सौरभ कुटे, शिवम कुटे, रोहित कुटे, अतुल कुटे, तुषार कुटे आदींनी परिश्रम घेतले.