पुणे – आव्हाळवाडी तालुका हवेली येथील महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव गणेश कुटे यांची भाजप युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी ही निवड केली.
दोन वेळा हवेली तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष पद तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद गणेश कुटे यांनी भूषवले आहे. तालुक्यातील सर्वात मोठा पक्षप्रवेश हा गणेश कुटे तालुका अध्यक्ष असताना झाला होता. भाजपची संघटना मजबूत करून गावोगावी कार्य केल्याने भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश सचिव पदापर्यंत कुटे यांची वर्णी लागली होती.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्यातील काही निवडक भाजपच्या कार्यकर्त्यांची निमंत्रित सदस्य पदी निवड केली असून यात गणेश कुटे यांचा नुकताच समावेश झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. आता गणेश कुटे यांची राज्य युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी वर्णी लागल्याने माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार राहुल कुल,भाजप नेते विक्रांत पाटील, राहुल लोणीकर, प्रदीप कंद, शरद बुट्टे पाटील, हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, संदीप सातव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कुटे, प्रदीप सातव पाटील,जयप्रकाश सातव पाटील, गणेश सातव,विजय जाचक, आदींनी कुटे यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपाध्यक्ष विक्रांत पाटील, युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष राहुल लोणीकर,अनुप मोरे, सुदर्शन पाटसकर, कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे,यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष पदी काम करण्याची संधी मिळाली असून राज्यातील युवा संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहे.
– गणेश कुटे (उपाध्यक्ष, राज्य युवा मोर्चा महाराष्ट्र)