आंध्र प्रदेश – सनी लिओन चांगलीच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही तिचा बराच बोलबाला आहे. मिलियनच्या घरात तिचे फॉलोअर्स आहेत यावरून तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. तिची अगोदरची प्रतिमा काय होती, हा भाग बाजूला सोडला तर हिंदी चित्रपटसृष्टीने आणि येथील प्रेक्षकांनी तिला स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच ग्लॅमरस किंवा बोल्ड आणि ब्युटीफुल हा टॅग तिच्या नावापुढे लागला गेला आहे.
यातच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती तिच्या सोशलवरील पोस्टमुळे चर्चेत आली नसून तर एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात सनीचे दोन मोठ्या आकाराचे पोस्टर्स लावल्यामुळे चर्चेत आली आहे.
आंध्रप्रदेशातील नल्लोर जिल्ह्यातील शेतकरी अक्कीनापल्ली चिनचू रेड्डी यांनी त्याच्या शेतात सनीचे दोन मोठ्या आकाराचे पोस्टर्स लावले आहे. या पोस्टरमध्ये सनी ही लाल रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे. त्याबरोबर या पोस्टरमध्ये तेलगू भाषेत लिहिण्यात आले आहे की,’माझ्यासाठी रडू नका किंवा माझा मत्सर करु नका.’
शेतकऱ्याला या पोस्टर बाबत स्थानिक पत्रकाराने विचारले असता त्याने हे पोस्टर लावण्या मागचं कारण सांगितलं आहे.
ते म्हणाले,’ माझ्या शेतात पिकणाऱ्या पिकाला लोकांची नजर लागू नये म्हणून मी हि अनोखी शक्कल लढवली आहे. येथून जाणाऱ्या लोकांना जेव्हा हे पोस्टर दिसते त्यावेळी त्यांची नजर माझ्या शेत मालावर जात नाही. अन् या पोस्टरमुळे लोकांची दिशाभूल होत असते.’ असं म्हणत त्यांनी हे पोस्टर लावण्यामागचे कारण सांगितले आहे.