टोकियो – भारताचा अव्वल तिरंदाज तरुणदीप राय यालाही पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्याने विजयी सलामी देताना धडाक्यात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा केली जात होती.
मात्र, अखेर त्याला या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इटलीच्या इताय शौनीसारख्या बलाढ्य खेळाडूला तरुणदीपने चांगली लढत दिली. पण करुणदीपकडून काही चुका झाल्या व हा सामना शौनीने 6-5 असा जिंकला.