#SLvIND : आठ खेळाडूंना विश्रांती

कोलंबो – पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, इशान किशन, देवदत्त पडिक्कल आणि कृष्णप्पा गौतम हे बुधवारी झालेल्या सामन्यात खेळू शकले नाहीत. श्रीलंकेविरुच्या या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात या खेळाडूंना विश्रांती दिली गेल्याचे सांगण्यात आले असले तरीही ते करोनाबाधित कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्यामुळेच खेळू शकले नाहीत.

अर्थात या खेळाडूंची करोना चाचणी झाली असून, त्यात ते निगेटिव्ह ठरले असल्याने भारतीय संघाला काहीसा दिलासा मिळाला. या खेळाडूंची आणखी एक चाचणी केली जाणार आहे.

त्यात जर कोणत्या खेळाडूला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले तर त्यांना श्रीलंकेतच विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे गुरुवारी या मालिकेतील अखेरचा सामना जरी पार पडला तरी त्यांना भारतात लगेचच परतता येणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.