बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी उत्तम लयीत असल्याचे दिसून आले आहेत. भारताचा बॉक्सर शिव थापाने पाकिस्तानच्या सुलेमान बलोचला याला 5-0 च्या फरकाने मात देत 63 किलो वजनी गटात पहिला विजय मिळवला आहे. या विजयासह त्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पहिल्या दिवशी भारताचा बॉक्सर शिव थापाने राऊंड ऑफ 32चा सामना पाकिस्तानच्या सुलेमान बलोच विरुद्ध खेळला. सुरुवातीपासूनच शिवने सामन्यावर आपली पकड ठेवली होती. पाच वेळा आशियाई चॅम्पियनशिप विजेत्या थापा तांत्रिकदृष्ट्या बलोचपेक्षा खूप वरचढ दिसत होता. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखले.
Big applause for Shiva✨👌@shivathapa (63.5KG) 🥊 defeats Pakistan’s Baloch Suleman by unanimous decision 5️⃣:0️⃣ and advances to the Round of 16
Well done Champ🤩#Cheer4India#IndiaTaiyaarHai#India4CWG2022 pic.twitter.com/8ptiNedtfP
— SAI Media (@Media_SAI) July 29, 2022
माजी वर्ल्ड चॅम्पियनशिप कास्यपदक विजेत्या सुलेमाननेही चांगला बचाव केला. पण सुलेमानला त्याचा सामना करणे कठीण जात होते. अखेर सामन्यात सुलेमानला अधिक प्रतिवार न करू देता थेट 5-0 च्या फरकाने मात देत विजयावर शिक्कामोर्तब केला. आता उपांत्य फेरीत त्याची लढत 2021च्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या रिसे लींचशी (स्कॉटलंड) होणार आहे.