वाघोली ( प्रतिनिधी) : केसनंद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी हवेली तालुका भाजपाचे सरचिटणीस नितीन गावडे यांची तर उपसरपंचपदी रूपाली गणेश हरगुडे यांची निवड झाली आहे.
निवडीबद्दल पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, माजी उपसरपंच सचिन जाधव, हवेली तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष दिनेश झांबरे, संदीप नाना सातव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजेद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य दत्ता आबा हरगुडे, सचिन हरगुडे, विशाल हरगुडे पाटील, धनाजी पोपट हरगुडे, गणेश हरगुडे, नवनाथ हरगुडे, तानाजी आप्पा बांगर, अनंत तांबे, दत्ता आबा खुळे आदी मान्यवर उपस्थित होते.