वाघोली (प्रतिनिधी) : पुणे महानगरपालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश झाला असून या तेवीस गावांचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी केले.
वाघोली तालुका हवेली येथे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे बोलत होते.
याप्रसंगी वाघोली मध्ये ग्रामनिधीतून मंजूर असलेली पण पुणे महानगर पालिकेत समाविष्ट झाल्याने अपुरी राहिलेली कामे, ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यातील नियोजित कामे, वाघोली साठी भामा-आसखेड मधून पाणी मिळावे, वाघोली साठी भरपूर निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच नागरिकांना सोयी सुविधा देताना प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतेही अडचणी निर्माण होऊ नये याबाबतची खबरदारी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना चर्चा करून सूचना करण्यात आल्या.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद रामभाऊ दाभाडे, डॉ. चंद्रकांत कोलते,हवेली तालुका पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य माणिकराव सातव पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच समीर भाडळे, माजी उपसरपंच कैलास सातव पाटील,वाघोलीचे उपसरपंच महेंद्र भाडळे, बाळासाहेब सातव, बाळासाहेब सातव सर, , माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय कटके, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे आदी मान्यवर उपस्थित होते.