नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम या आज त्यांच्या वसंत विहारमधील निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
त्या 67 वर्षांच्या होत्या. या हत्या प्रकरणात त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका सफाई कामगाराला अटक करण्यात आली आहे. तो 24 वर्षीय असून त्याचे नाव राजू आहे एवढीच माहिती आत्तापर्यंत उपलब्ध झाली आहे.
मंगळवारी रात्री राजू त्यांच्या निवासस्थानी आला. त्यानंतर त्याचे अन्य दोन साथीदारहीं तेथे आले. त्यांनी श्रीमती कुमारमंगलम यांना एका खोलीत ओढत नेऊन उशीने त्यांचे तोंड दाबून धरले. त्यातच त्यांचे निधन झाले. चोरीच्या बहाण्याने त्याने ही हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे.