मुरादाबाद – समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विजेंद्र पाल सिंह यादव यांचे शुक्रवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांची मुलगी पिंकी यादव सध्या संभल जिल्ह्यातील असमोली विधानसभा मतदारसंघातून सपच्या आमदार आहेत. विजेंद्र पाल सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच सपा आणि त्यांच्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर संभळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विजेंद्र पाल यांना चार दिवसांपूर्वी पोटात संसर्ग झाल्याने सिद्ध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी त्यांना ह्रदयविकाराचे दोन झटके आले. त्यानंतर त्यांचे निधन झाले.
विजेंद्र पाल सिंह यादव यांनी कॉंग्रेसमधून राजकीय प्रवास सुरु केला. बहजोई विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. 1980मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर ते संभळचे खासदार झाले, यानंतर ते 1985मध्ये बहजोई येथून कॉंग्रेसचे आमदार निवडून आले आणि 1987 मध्ये मंत्री झाले.
Gujarat Election 2022 : मोदींच्या सभा स्थानाजवळ ड्रोन उडवणारे तिघे अटकेत
1989च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पण 1991 मध्ये पुन्हा ते कॉंग्रेसमधून आमदार झाले. यानंतर त्यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला. 1996 मध्ये समाजवादी पक्षातून आमदार झाले. विजेंद्र पाल हे उत्तर प्रदेश बेव्हरेज फाऊंडेशनचे अध्यक्षही होते.