पुणे – रिक्षा चालकाचा डोके, डोळे आणि शरीरावर ठिकठिकाणी वार करून खून केल्याप्रकरणात एकाला सत्र न्यायाधीश एस.एम.आगरकर यांनी 25 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला.
शुभम संजय धुमाळ (वय 20, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) असे जामीन झालेल्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. अक्षय मुल्या यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना ऍड. विशाल शिरतोडे आणि ऍड. विजय बंडगर यांनी सहाय्य केले.
रिक्षाचालक गणेश हनुमंत पवार (वय 32, रा. वारजे) हे 16 ऑक्टोबर 2020 रोजी पळसे, ता. मुळशी गावच्या हद्दीत जखमी अवस्थेत आढळून आला. 17 तारखेला ससून येथे मृत्यू उपचारा सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांची पत्नीने पौड पोलिसात फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्यात अटक झालेल्या पांडुरंग वीर याचे गणेश यांच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम आहे. तो त्यांना त्रास देत असल्याच्या कारणावरून ताम्हिणी घाट येथे नेवून खून केल्याचे निष्प्पन झाले आहे.
या प्रकरणात नीलश याने ऍड. अक्षय मुल्या यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्याने गुन्हा केलेला नाही. त्याला यात अडकविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्याच्याविरोधात पुरावा नाही, त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ऍड. मुल्या यांनी केला.