देशासह जगभरात दोन वर्षांपासून करोना संसर्गने कहर केला असून लॉकडाउनमुळे चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक चित्रपटांनी आपला मोर्चा
View this post on Instagram
ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळविला आहे. या महामारीत अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
View this post on Instagram
बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी “हसीन दिलरुबा’ चित्रपट 2 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. तसेच तापसीचा आणखी एक चित्रपट ओटीटीवर रिलीज होऊ शकतो.
View this post on Instagram
तिचा “रश्मि रॉकेट’ हा चित्रपटदेखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होउ शकतो.
View this post on Instagram
या चित्रपटात तापसी पन्नू ही एक ऍथलिटची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासाठी तिने विशेष ट्रेनिंग घेतले असून स्पोर्टस वुमनसारखे दिसण्यासाठी तिने कठोर मेहनत घेतली आहे. “रश्मि रॉकेट’चे दिग्दर्शन आकर्ष खुरानाने केले आहे.
View this post on Instagram
“रश्मि रॉकेट’चे प्रोड्यूसर्स रोनी स्क्रूवाला, नेहा आनंद आणि पंकज हे ऍमेझॉन प्राइमसोबत लवकरच डील निश्चित करणार आहे. या डीलमुळे प्रोड्यूसर्सला मोठी रक्कम मिळणार असून तो सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होउ शकतो.
View this post on Instagram