मल्लिकाचा गॉर्जियस अवतार बनला इन्स्टावर सेन्सेशनल

बॉलिवूडच्या मेनस्ट्रीमपासून दूर असलेली आणि लॉस एंजेलिसमध्ये स्थिरावलेली “मर्डर’ची हॉट क्वीन मल्लिका शेरावत सोशल मिडीयामध्ये मात्र सतत ऍक्‍टीव्ह असते. आपले जुने नवे फोटोग्राफ्स आणि व्हिडीओ शेअर करुन ती फॅन्सचे लक्ष वेधून घेत असते.

आताही इन्स्टाग्रामवर मल्लिकाने आपले फॅन्सी कलरमधल्या ड्रेसमधील काही फोटोज अपलोड केले आहेत. या फोटोजना फॅन्सचा उदंड प्रतिसाद लाभत असून आपण लॉकडाऊन उठल्यानंतरच्या निसर्गाचा आनंद घेत असल्याचे मल्लिकाने सांगितले आहे.

वर्ष 2004 मध्ये आलेल्या “मर्डर’ या सेक्‍सी थ्रिलरमधल्या मल्लिकाच्या बोल्ड सीन्सनी सिनेरसिक घायाळ झाले होते. “भिगे होंठ तेरे…’ या गाण्यने तर तहलका माजवला होता. मात्र, अनेकांना माहिती नसेल की, “मर्डर’ मल्लिकाचा पहिला सिनेमा नव्हता.

“ख्वाहिश’ या अकबर अरबियांच्या सिनेमाद्वारे मल्लिकाने नायिका म्हणून पदार्पण केले होते. गोविंद मेननच्या दिग्दर्शनातल्या या सिनेमात हिमांशु मलिक तिचा नायक होता. या सिनेमात मल्लिकाने लेखा खोरजुवेकर हे पात्र रंगवले होते आणि विटा-खानापूरच्या परिसरात सांगली जिल्ह्यात या सिनेमाचे शूटींग झाले होते.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रीय साडी नेसून, सतार वादन करणारी मल्लिका कुणाला पहायची असेल, तर त्यांनी हा सिनेमा अवश्‍य पहावा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.