मिका सिंह आणि कमाल खान यांच्यातील वाद गेल्या काही काळापासून सुरू आहे. हे दोघेही सोशल मीडियावर शेरेबाजी करत असतात. केआरकेवर एक गाणे बनवणार असल्याचे मिका सिंह म्हणाला होता. आता या गाण्याचे पोस्टर मिका सिंहने रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये मिका सिंह एका गाडीवर बसलेला दिसतो आहे.
View this post on Instagram
तर खाली एक कुत्रा आहे. या कुत्र्याचा चेहरा एडिट करून त्या जागेवर केआरकेचा चेहरा लावला गेला आहे. गाण्याचे नाव आहे “केआरके कुत्ता’ आणि हे गाणे 11 जूनला रिलीज केले जाणार आहे. हे गाणे स्वतः मिकाने गायले आहे आणि त्याचे संगीतदेखील शोरीब तोषीबरोबर त्यानेच दिले आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी मिका सिंह केआरकेच्या घरी गेला होता. मात्र, घरात न जाता केवळ गेटवर आपले नाव लिहून परत आला होता. आपल्याला घाबरून केआरकेने घर बदलले असे त्याने सांगितले. तर मिका आपल्याला घाबरून घरातच आला नाही, असे केआरके म्हणाला होता. सलमानच्या “राधे’वर केआरकेने टीका केली आणि त्यानंतर सलमानने केआरकेवर दावा ठोकल्यानंतर मिका आणि केआरकेमध्ये वाद सुरू झाला आहे.