ड्रामा क्वीन राखी सावंत कधी काय करेल याचा काहीच नेम नाही. ती सातत्याने कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता राखीने तिच्या फिटनेसवर काम करायला सुरुवात केली आहे. तर स्वतः बारीक होण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे.
View this post on Instagram
राखीचा एक फिटनेस सेंटरमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती हॅंडस्टॅंड करताना दिसत आहे. राखीने स्वतः हा फिटनेस व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये माय योगा असं लिहिलं आहे. त्यामुळे राखीने आता फिटनेसला मनावर घेतल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
यानंतर तिला अनेक कमेंट्सही मिळाल्या आहेत. तर एकाने लिहिले आहे, शेहनाझ गिलनंतर तुझंच ट्रान्सफॉर्मेशन होणार’. अभिनेत्री शेहनाझ गिलने देखील तिचे वजन कमी केले होते. त्यानंतर मात्र ती प्रसिद्धीझोतात आली. त्यामुळे राखीला शेहनाझसारखं व्हायचं आहे का असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.
View this post on Instagram
राखीची मेहनत पाहता राखीदेखील लवकरच तिची सुंदर फिगर फ्लॉन्ट करताना दिसेल यात काहीच शंका नाही. राखी नेहमीच तिचे हटके व्हिडिओस शेअर करत असते. नुकतचं तिने तिचा नागीन रूपातला फोटो शेअर केला होता. याशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर ती अनेकदा फिरताना दिसते. त्यामुळे ती सतत विविध कारणांसाठी चर्चेत राहते.
View this post on Instagram
अभिनेते जॉनी लिव्हर यांची मुलगी कॉमेडियन जॅमी लिव्हरने नुकतीच राखीची मीमिक्री केली होती. त्यानंतर तो व्हिडिओ फार व्हायरल झाला होता. राखीचा हटके अंदाज त्यात पाहायला मिळाला होता. लवकरच राखी इंडियन आयडॉलच्या एका भागात देखील दिसणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली.