पुणे – ‘टाईमपास’ चित्रपटात ‘प्राजक्ता’ची भूमिका साकारून केतकी माटेगावकरने अवघ्या प्रेक्षकवर्गाला वेड लावले होते. लोभसवाणा चेहरा आणि गोंडस स्मितद्वारे, ‘प्राजु’ने लाखो चाहत्यांची मने चोरली आहेत.
View this post on Instagram
केतकी माटेगावकर अभिनयाव्यतिरिक्त आपल्या सुमधुर आवाजामुळेही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. केतकी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते असते.
View this post on Instagram
एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने नुकतंच आपला एक ग्लॅमर्स फोटो सोशलवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये केतकी खूपच सुंदर दिसत आहे. फोटोत तिने लाल रंगाचा प्रिंटेड क्रॉप टॉप व त्याच्यासह त्याच रंगाचे स्कर्ट परिधान केले आहे.
View this post on Instagram
तसंच चेहऱ्यावर परफेक्ट असा मेकअप करून तिने फोटोसाठी हॉट पोझ दिली आहे. सोज्वळ प्राजूचा हा मादक अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. तिच्या फोटोवर फॅन्सने अक्षरशः कमेंट आणि लाईक्सचा पाऊस वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
केतकीने आजवर केवळ मराठी चित्रपटांमध्येच अभिनय केला असला, तरी अमराठी प्रेक्षकांनाही तिच्या गाण्यांनी वेड लावलं आहे. कोवळ्या वयातील प्रेमभावनांचा प्रवास उलगडणाऱ्या ‘शाळा’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
View this post on Instagram
त्यानंतर केतकीने बऱ्याच मराठी चित्रपटात भूमिका साकारून आपले नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटांच्या यादीत ‘आरोही’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘फुंतरू’ यांचा समावेश आहे. ‘टाईमपास’ चित्रपट केतकीचा सर्वात हिट चित्रपट ठरला.
View this post on Instagram