वाघोली (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण झाले आहेत. या 7 वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशात आमुलाग्र बदल घडविले व देशाला प्रगतीपथावर नेले. हे करत असताना नरेंद्र मोदी यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. आज केंद्रातील भाजप सरकारला 7 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा व भाजप तालुका हवेलीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना सन्मानित करून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील , पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश बापू कुटे व भाजप हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीपदादा सातव पाटील, युवा नेते स्वप्नील कुटे यांच्या वतीने वाघोली तालुका हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. वर्षा गायकवाड डॉ. नागसेन लोखंडे, डॉ. लोहार, कर्मचारी, आशा वर्कर यांना मिठाई वाटप व हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर, मास्क चे वाटप करण्यात आले.
वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कोविड-19 (covid-19) यांच्या वाढत्या प्रभावाच्या काळात अविरत सेवा केल्याबद्दल त्यांना कोरूना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. याशिवाय नागरिकांची वैद्यकीय चाचणी वेळेत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान भाजपच्या वतीने करण्यात आला असल्याचे भाजपचे युवा मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य गणेश कुटे यांनी सांगितले.