पुणे -करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेला कडक लॉकडाऊन शनिवारी (दि. २९) पासून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे, गेल्या दीड महिन्यांपासून दर रविवारी बंद राहणारा मार्केटयार्डातील तरकारी, फुले, फळे, कांदा-बटाटा, पान व केळी विभाग आज (दि. ३०) पासून साप्ताहिक सुट्टी वगळून सुरू राहणार आहे.
याखेरीज, उपबाजारही सुरू राहणार आहेत. बाजार पुर्ववत सुरू झाला असून बाजार घटकांनी कोरोना नियमावलीचे पालन करत व्यवहार पार पाडावे, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केले आहे.