पुणे – पहिला विवाह लावल्याचा जाब विचारणाऱ्या दुसर्या पत्नीस पतिने 25 लाखाची खंडणी मागितली. तसेच तीला जीवे मारण्याची धमकीही दिली. भारत बाजीराव पवार( ३९ रा सांगली ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वारजे येथे रहाणार्या 30 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
पवार याने त्याचे पहिले लग्न झाले असताना व त्यास पहिल्या बायको पासुन एक मुलगी आहे हे लपवुन पिडीत महिले सोबत दुसरे लग्न केले तीने याबाबत विचारणा केली असता तीला शिवीगाळ करुन मारहाण केली. यानंतर अनैसर्गिक संभोग करुन पिडीतेचे लग्नातील २२ तोळे सोन्याचे दागिने घेवुन अपहार केला तसेच रात्रीचे वेळी चे एकांतातले फोटो व्हायरल करण्याची धमकी देवुन तीच्कयाडे २५लाखाची खंडणी मागुन निनावी चिट्ठी पाठवुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे