सेल्फीसाठी तिने केले पुशअप्स

मिलिंद सोमण रायपूरच्या एका बाजारपेठेत होता. त्याला पाहून त्याची एक महिला चाहती, साधारण चाळीशी ओलांडलेली त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आली. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

नॉर्मली अशा सिच्युएशनमध्ये सेलिब्रिटी मंडळी ऍटिट्यूड दाखवतात, मुजोरपणा करतात. मात्र, मिलिंदचे वेगळेपण वेगळेच. त्याने त्या महिलेला दहा पुशअप्स करायला सांगितले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

तिनेही काही कळायच्या आत पुशअप्स सुरू केले. तेही भर रस्त्यात आणि साडी नेसून. हा व्हिडिओ पाहून मिलिंदची तारीफ तर झालीच, मात्र त्याच्या त्या चाहत्या महिलेवरही कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

 मिलिंद याबाबत म्हणतो की, त्याने कॅमेरा सुरू करायच्या आतच त्या महिलेने पुशअप्स सुरू केले. तिने आता नाही, रस्त्यावर नाही, साडी नेसली असली काही कारणे सांगितली नाहीत. तुम्हाला जर आवडीचे काही प्राप्त करायचे असेल तर अशी कारणे नसतात. 

असे नमूद करून आपण आपल्या अनेक चाहत्यांना असे पुशअप्स करायला सांगितले आहे व त्यानंतरच सेल्फी दिला असल्याचे तो म्हणतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.