नवी दिल्ली : करोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे. यात प्रत्येक जण आपल्या परीने जुगाड करत मार्ग काढत आहे.
Indian innovation
Perhaps #Odisha pic.twitter.com/NJZwfGOVzT
— Rupin Sharma IPS (@rupin1992) May 25, 2021
असाच काहीस ओडिसामध्ये एका मुलाने जुगाड लढवत त्याच्या बाईकला चक्क रुग्णवाहिका केलं आहे. विशेष म्हणजे या बाईक अॅम्बुलन्सच्या मदतीने तो गरजु रुग्णांची मदत करत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये वेळेवर रुग्णालयात पोहोचवता यावं यासाठी बाईक अॅम्बुलन्सचा जुगाड केला आहे. ही बाईक अॅम्बुलन्स तो स्वत:च चालवत असून बाईकला एक्स्ट्रा सीट लावून त्यावर रुग्णाला झोपायची सोय केली आहे. रुग्णाला व्यवस्थित झोपता यावं अशी या गाडीची रचना केली आहे.
सध्या हा व्हिडियो सोशलवर तुफान व्हायरल झाला असून बाईक अॅम्बुलन्सच्या हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. सोबतच भारतीय शोध असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला असून त्याला २१ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर, लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे.