पुणे – वानवडी पोलिसांनी वाहन चोरी व मोबाईल चोरी करणाऱ्यास अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीचा 5 लाख 44 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये एक चारचाकी गाडीचाही समावेश आहे. विशाल उर्फ बिच्या गोटुराम काळे (19, सध्यारा.पाटील इस्टेट झोपडपट्टी शिवाजीनगर पुणे, मुळ गाव चांडोली फाटा, राजगुरुनगर ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयामधील चोरीस गेले टाटा टियागो कारचा तपास चालु असताना पोलीस शिपाई अमित चिव्हे यांना खबर मिळाली की, चोरीस गेलेली टाटा टियागो कार ही चांडोली फाटा, राजगुरुनगर येथुन पुण्याच्या दिशेने येणार आहे. ही खबर प्रभारी अधिकारी तपास पथक पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी दिली. त्यानूसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली.
पथका राजगुरुनगर टोल नाक्यावर चोरीस गेलेली कार ही टोल नाक्यावरुन पास होवुन ती पुण्याच्या दिशेने जात असताना दिसली. पथकाने ताबडतोब आम्ही दोन्ही टिमने मिळुन चोरीच्या गाडीचा पाठलाग करुन त्यास चाकण चौकाचे अलीकडे पोलीस गाडी आडवी मारुन थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यामधील गाडी चालक हा उतरुन माळरानात पळुन गेला.त्याचा माळरानात पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही.
तसेच गाडीतील दुस-या व्यक्तीस ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे त्याने दाखल गुन्हा हा त्याचा साथीदार याचेसोबत केला असल्याचे कबुल केले आहे. आरोपीकडुन वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर, तसेच यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण, मोहोळ पोलीस स्टेशन सोलापुर ग्रामीण, केज पोलीस स्टेशन जिल्हा बीड इत्यादी परिसरात मोबाईल चोरी, वाहन चोरी केलेली असुन मोबाईल चोरीचे 2 गुन्हे, वाहन चोरीचे 2 गुन्हे असे एकुण 4 गुन्हे उघड करुन त्यामध्ये 1 चारचाकी, 1 दुचाकी, 8 मोबाईल असा एकुण 5 लाख 44 हजार रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई ही उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड, पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस उप-निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, सहायक फौजदार संतोष तानवडे, पोलीस हवालदार राजु रासगे, संतोष नाईक, संजय बागल, विनोद भंडलकर, पो.ना.योगेश गायकवाड, संभाजी देविकर, अतुल गायकवाड, पोलीस शिपाई नवनाथ खताळ, सुधीर सोनवणे, महेश कांबळे, अमित चिव्हे यांच्या पथकाने केली आहे.