पुणे – पुर्वीच्या भांडणातून एका व्यक्तीला लाकडी दांडके व स्टंम्पने मारहाण करून गंभीर जखमी करत खूनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चंद्रमानगर वसाहत येरवडा येथे घडली.
याप्रकरणी पोलिसांनी सचिन रावसाबेह तिजोरे (वय.29), व सागर रावसाहेब तिजोरे (वय.25,राहणार दोघेही चंद्रमानगर वसाहत) या दोघा भावांना अटक केली आहे. याबाबत सुरेश खरात (वय.38,रा. चंद्रमानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी खरात हे बुधवारी सकाळी घरी असताना आरोपींनी त्यांच्या घरात घुसून तु माझ्या भावाला नडला आहे तुला जीवंत सोडणार नाही असे म्हणत मारहाण करण्यात सुरूवात केली. यावेळी लाकडी दांडके व स्टंम्पने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी खूनच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविंद्र वारंगुळे करीत आहेत.