पुणे,दि.20- विश्रामबाग पोलिसांनी अट्टल रिक्षा चोरास अटक केले. त्याच्या ताब्यातून चार चोरीच्या रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. अशोक उर्फ संतोष चंद्रकांत ढेरे (46,रा.उबाळेनगर बिल्डींग नं.1 वाघोली पुणे मुळगाव मु.पो.करपडी ता.राशीन.जि.अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसारदिनांक 17 मे चे दरम्यान आठवले डेअरी समोर केळकर रोड येथे रिक्षा चोरी झाली.त्याबाबत फिर्यादी संतोष दत्तात्रय जगताप (रिक्षा चालक रा. ए , शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिल्यावरून विश्रामबागपोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
रिक्षाचा शोध घेण्याकरीता त्या परिसरातील खासगी व सरकारी सीसीटिव्ही कॅमे-यांची तपासणी विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील कर्मचारी करत असताना संशयित आरोपीचे फुटेज प्राप्त केले . गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अमलदार सात्ताप्पा पाटील यांना त्यांचे खबर मिळाली की नमुद सीसीटिव्ही फुटेज मधील संशयित आरोपी हा रामेश्वर चौकात आला आहे.
त्यानूसा सापळा लावुन सदर संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाणेस आणुन विचारपुस केली असता आरोपी अशोक उर्फ संतोष ढेरे याने गुन्हयाची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हददीतून चोरलेल्या दोन रिक्षा कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली एक रिक्षा अशा चार चोरीच्या रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या चोरीच्या रिक्षांची िंकंमत एकुण 3 लाख 85 हजार रुपये आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे, उप-निरीक्षक राकेश सरडे, गणेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार संजय दगडे, बाबासाहेब दांगडे, धीरज पवार, विठठल खिलारे, हेमंत पालांडे, प्रशांत शिंदे, सात्ताप्पा पाटील, अभिजीत गोंजारी यांच्या पथकाने केली.