नवी दिल्ली : अमेरिकेने कोभारताला मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसलेला असून दैनंदिन रुग्णसंख्या तीन लाखांच्या पुढे गेली असताना युरोपिअन युनिअन, जर्मनी, फ्रान्, इंग्लंड तसेच अनके देश मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. यानंतर अमेरिकेनेही भारताला कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याची ग्वाही दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले असून दोन्ही देशांमधील स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. तसेच मदतीचे आश्वासन दिल्याबद्दल आपण जो बायडन यांचे आभार मानल्याचेही त्यांनी सांगितले आहे. “जो बायडन यांच्याबरोबरील चर्चा फलद्रुप झाली. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या करोना स्थितीवर आम्ही सविस्तर चर्चा केली. अमेरिकेकडून भारताला देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल मी जो बायडन यांचे आभार मानले,” असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय भारताकडून करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी भारताकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांवरही चर्चा झाली.
Had a fruitful conversation with @POTUS @JoeBiden today. We discussed the evolving COVID situation in both countries in detail. I thanked President Biden for the support being provided by the United States to India.
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2021
अमेरिकेकडून भारताला व्हेंटिलेटर, कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तसंच इतर साधनसामग्री पुरवली जाणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी करोनाशी लढण्यासाठी भारताला आणि भारतीयांना साहित्यासोबतच सर्व मदत देण्याचं आश्वासन दिले आहे.
Just as India sent assistance to the United States as our hospitals were strained early in the pandemic, we are determined to help India in its time of need. https://t.co/SzWRj0eP3y
— President Biden (@POTUS) April 25, 2021
जो बायडन यांनी सोमवारी ट्विट करत, “ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला करोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचं ठरवलं आहे” असं म्हटलं. आपला सहकारी भारताला मदत देण्यास उशीर करत असल्याने भारतीय अमेरिकी तसंच पक्षातील काही सहकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.